Tuesday, June 20, 2023

बाणगाव खुर्द येथे मोठ्या उत्साहात आमदार आपल्या दारी महाशिबिराचे आयोजन , शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांची उपस्थिती,

  नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी)   -  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून ,  बाणगाव खुर्द येथे जातेगाव गटातील मांडवड गणातील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
   शिबिराचे उद्घाटन श्रीफळ वाढवत शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी आमदार सुहास आण्णांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाची दखल राज्य सरकार ने घेऊन राज्यात शासन आपल्या दरबारी मोहीम सुरू केली, सर्व सामान्यांना गावात येऊन विविध सुविधा पुरविण्याची ही योजना महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले. उपस्थित नागरिकांनी जास्तीत जास्त या अभियानाचा फायदा घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
   राधाकृष्ण लॉन्स बाणगाव खुर्द येथे  मोठ्या संख्येने मांडवड गणातील प्रत्येक गावातून आलेल्या नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून विविध सुविधांचा लाभ घेतला. 
     ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच विविध शासकीय दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात आणि म्हणूनच या शिबिराच्या माध्यमातून त्यांना तात्काळ विविध दाखले व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा हेतू मोठ्या प्रमाणात साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. 
   रेशन कार्ड संबंधित विविध त्रुटी अडचणी तसेच विविध निराधार योजना विधवा पेन्शन योजना व इतर शासकीय दाखल्यांसाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. 
     आरोग्य सुविधा महावितरण तहसील पंचायत समिती डोळे चेकप असे विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते. 
          राज्य कृषी अभियांत्रिकी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना या वेळी ट्रॅक्टर देण्यात आले. 
        या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, प्रमोद भाबड, बाजार समिती मा.सभापती तेज कवडे, संचालक एकनाथ सादगिर, विक्रम फोडसे, बाळू पवार, नंदू खरात, समाधान पाटील, कैलास चोळके, बबलू पाटील, योगेश इमले, बाबा बिलोरे, कैलास गायकवाड, सागर हिरे, विलास गायकवाड, भाऊसाहेब सदगीर, शिवाजी वडगळ, दत्तू काळे, शांताराम कवडे, प्रभाकर कवडे, रवी दादा पाटील, समाधान हिरे, वाल्मीक गोराडे आदी उपस्थित होते
        शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी ,शिवसैनिक, विविध गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन उप चेरमन सर्व सदस्य व इतर लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
    नांदगाव तालुक्यातील  कासारी,पोही ,कसाबखेडा ,टाकळी बू.खुर्द ,तांबेवाडी ,माणिकपुंज , बाणगाव,बू खुर्द , खिर्दी , भौरी , वडाली बू खुर्द , सोयगाव , मोरझर , दहेगाव , तांदुळवाडी, मांडवड लक्ष्मीनगर या गावातील नागरिकांनी या वेळी उपस्थिती लावली.


बाणगाव शिबिराची आकडेवारी - 
१) आरोग्य विभाग - ४५६
२) नेत्र तपासणी - ७२५
३) चष्मे - ६७४
४) डोळ्यांचे ऑपरेशन -  ३०
५)शासकीय दाखले - १०५
६) रेशन कार्ड - २२८
लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. 

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....