नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - न्यायडोंगरी येथे सोमवारी दि. १९ रोजी शनेश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित सी.जी. ए इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यायडोंगरी येथे शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा देखील उत्साह दिसून आला.या प्रसंगी आलेल्या सर्व उपस्थित पालक व विद्यार्थ्याचे औक्षण करून तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाल विद्यार्थ्यांनी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटत शाळेचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला .त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment