छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर
नांदगाव ( प्रतिनिधी ) - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे इयत्ता बारावी परीक्षेत कला वाणिज्य व विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील स्कूल कमिटी सदस्य देवाजी कदम रामनिवास करवा डॉ.प्रवीण निकम आणि विद्यार्थी पालक ॲड.चौधरी साहेब या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कला शाखेत प्रथम आलेला कोल्हे ओंकार गंगाधर ४८३ गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला . त्याचा सत्कार सर्जेराव आबा पाटील यांनी गुलाब पुष्प पुस्तक प्रतिमा भेट देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार केला द्वितीय क्रमांक महाजन अक्षय पुंजाराम ४४९ गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचा सत्कार देवाजी कदम स्कूल कमिटी सदस्य यांनी गुलाब पुष्प पुस्तक प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. तर तृतीय क्रमांक सूर्यवंशी सोनाली रमेश ४४६ गुण मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तिचा सत्कार रामनिवास करवा यांनी गुलाब पुष्प प्रतिमा भेट देऊन सत्कार केला . वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला चौधरी प्रसाद भालचंद्र ५३८ गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचा सत्कार महाविद्यालय स्कूल कमिटी सदस्य डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तक प्रतिमा भेट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली खत्री भूमी जयकुमार ५२३ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली तिचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे यांनी गुलाब पुष्प पुस्तक प्रतिमा भेट देऊन सत्कार केला तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला काळे उमेश गणेश ५१८ गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य राठोड सर यांनी गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार केला विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने राजपुरोहित विनेश लूनसिंग ५२८ गुण मिळून उत्तीर्ण झाला त्याचा सत्कार महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्रमुख श्री आर. टी. देवरे यांनी गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार केला द्वितीय क्रमांकाने पवार ज्ञानेश्वरी विश्वंभर ५१६ गुण मिळवून उत्तीर्ण झाली तिचा सत्कार चौधरी साहेब यांनी गुलाब पुष्प देऊन व पुस्तक प्रतिमा भेटून तिचा सत्कार केला तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला पांडे स्वराज पंकज ४८२ गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्याचा सत्कार देवाजी कदम यांनी केला .या गुणगौरव सोहळ्याचे प्रस्ताविक प्रा. बि.के.पवार यांनी केले. आपल्या प्रस्ताविक मनोगतातून नांदगाव महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक यांच्या सहकार्यातून दरवर्षी महाविद्यालयाचा निकाल उंचावतच असून विद्यार्थी हित लक्षात घेऊन महाविद्यालयातील प्राध्यापक हे ज्ञानदानाचे काम करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतात असे आपले मत मांडले . विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक सतत प्रयत्न करत असतात व प्राध्यापकांनाही पालकांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळते हे दैदिप्यमान यश मिळविण्यात महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन नेहमीच करण्यात येते असे आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी आपले प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालय असून या महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी दातृत्व दाखविणारे अनेक पालक व दाते सहकार्य करत असतात .त्यामुळे आम्हाला महाविद्यालयाची प्रगती व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच पाठबळ मिळत असते असे आपले मत व्यक्त करताना विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षापूर्तीचे महाविद्यालय म्हणून नांदगाव महाविद्यालयाची ओळख आहे .त्यामुळे विकासात्मक कामे करण्यासाठी आम्हाला सुद्धा उत्साह वाटतो आणि महाविद्यालयाची भरभराट होत आहे असे विचार व्यक्त केले व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या गुणवंत विद्यार्थी प्रतिनिधी खत्री भूमी जयकुमार व महाजन अक्षय पुंजाराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेले मार्गदर्शन यामुळेच आम्ही हे यश मिळू मिळवू शकलो असे महाविद्यालयातील प्राध्यापकांविषयीचे यथोचित गौरवउद्गार विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तर चौधरी साहेब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना जास्ती यशामुळे हुरळून न जाता आपल्याला आयुष्यात अनेक टप्पे पार करायचे आहेत त्यामुळे यश हे कायमच टिकून ठेवणे व सतत अभ्यासाची प्रगती टिकून ठेवणे याविषयीचे मत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment