नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव- साकोरा रस्त्यावर गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीत पिक अप आणि मोटारसायकल अपघातात तालुक्यातील दहेगाव येथील एक जण ठार झाला असून पिकअप चालकाविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवार (ता. २०) रोजी दुपारी नांदगाव - साकोरा रस्त्यावर गिरणानगर येथे एम. एच. १९बी.एम.२७३५ पिकअप नांदगाव कडून उड्डाणपूलाकडे जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील एम. एच. १५ सी.एक्स.८५१० हिरो होंडा स्पेलंडर गाडीला जबर धडक देवून दोन पलट्या घेवून गाडीची दिशा बदलली या अपघातात तालुक्यातील दहेगाव येथील मोटारसायकल चालक बाळासाहेब तुकाराम जाधव (४०) यांना डोक्याला जबर मार लागला त्यांना उपस्थितांनी उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाळासाहेब जाधव यांना दोन मुली व मुलगा असा परिवार असून तीन महिन्यांपूर्वी एका मुलीचा विवाह झाला असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने दहेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी दहेगाव येथे बाळासाहेब जाधव यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment