नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व्ही.जे.हायस्कूल मधील २०२३ या शैक्षणिक वर्षातील एसएससी परीक्षा, पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव शाळेचे माजी विद्यार्थी तथा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेले ऋषिकेश कर्नर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवराच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत मुख्याध्याप मनोहर बडगुजर यांनी केले यात शाळेच्या निकालाविषयी माहिती दिली व या वर्षी १२६ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाले असे सांगून शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी ऋषिकेश कर्नर व त्यांच्या आजी आजोबा व आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थाचा उपस्थित मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शाळेने व गुरुजनांनी केलेले संस्कार या शिदोरीवर आज मी जीवनात यशस्वी झाल्याचे सांगितले.मेंडपाळ व्यवसाय करणाऱ्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण केले,व स्वयंअध्ययन करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली यात माझे कुटुंब व शाळेचे योगदान आहे असे सांगून विद्यार्थांनी चिकाटीने अभ्यास करावा व असे सांगून गुणवंत विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे होते त्यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थांनी पुढील शिक्षण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून करावे म्हणजे यश हमखास मिळते असे सांगून शुभेच्छा दिल्या . गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने वैष्णवी जावरे व मृणाल रत्नपारखी याने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रसंगी मंचावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण , उपमुख्याध्यापक दिपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे , अॅकाडमी बोर्ड सदस्य भास्कर मधे,माजी शिक्षक भैयासाहेब चव्हाण,हेमंत शांडिल्य शिक्षक प्रतिनिधी गुलाब मोरे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे सदस्य,पालक, तसेच पत्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रियंका पाटील यांनी केले पाहुण्याचा परिचय प्रविण अहिरे यांनी केला आभार शिक्षक प्रतिनिधी अनिल तांबेकर यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील बक्षिस समिती प्रमुख दिपाली सांगळे ,कार्यक्रम प्रमुख राकेश ननावरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment