नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर निसर्गरम्य परिसरात असलेले जातेगाव हे पिनाकेश्वर महादेवाचे प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते. याठिकाणच्या निसर्गाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था शाखा नांदगाव तर्फे जनता विद्यालयात शून्य सर्पदंश अभियान राबवण्यात आले . विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे सापांचे चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी आपल्या भागात आढळणाऱ्या विषारी, नीम विषारी, आणि बिनविषारी सापांची माहिती वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव शाखाध्यक्ष प्रभाकर निकुंभ यांनी माहिती देताना सांगितले की, साप हा मानवी अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आणि शेतकऱ्याचा मित्र कसा आहे व सापांची गरज का आहे याचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे उपाध्यक्ष मंगेश आहेर, पवन झाडगे, ललित मोकळ, मिथुन राठोड यांनी अनावधानाने सर्पदंश झालाच तर दंशानंतर प्रथमोपचार कसा करावा हे प्रात्यक्षिका द्वारे करून दाखवले. सर्पदंश पीडित व्यक्तीला लवकरात लवकर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करावे तसेच कुठल्याही बाबा, बुवा किंवा मांत्रिक, तांत्रिक, आयुर्वेदिक उपचार मंदिर ठाणे किंवा दर्गा मध्ये घेऊन जाऊ नये जेणेकरून कुठलीही जीवित हानी होणार नाही. सर्पदंशावर प्रभावी औषध म्हणून A.S.V. (ऑंटी स्नेक व्हेनम)हे औषध ग्रामीण रुग्णालयात मोफत मिळते हे औषध सर्प दंशालवर प्रभावी ठरते. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी जातेगाव, बोलठाण. येथील स्थानिक सर्पमित्र रामेश्वर सोनवणे, सागर यादव, सोमनाथ येवले ,मयूर हसवाल तसेच डोंबिवलीचे सर्पमित्र ऋषिकेश सुरसे मयूर आहेर यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमासाठी जनता विद्यालयाचे प्राचार्य डी.वाय चव्हाण, वा.य. पी. चव्हाण, उमेश निकम, राहुल निकम, युवराज काळे, आप्पा सोनवणे, गोरख धोबी आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment