नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडी पासुन मुक्तता व्हावी या हेतूने रेल्वेच्या वतीने सबवे निर्मिती करण्यात आली . मात्र सबवे निर्मिती करतांनाच चुकीच्या पध्दतीने करण्यात आला. यावेळी नांदगाव करांनी विरोध देखील केला , मात्र विरोधाला न जुमानता रेल्वेच्या वतीने सबवे बनवण्यात आला. मात्र पावसाळ्यात पाणी इतर वेळी वाहतूक कोंडी यामुळे नांदगावकर त्रस्त झाले असुन रेल्वेच्या चुकीचा फटका मात्र नांदगावकराना बसत आहे . यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य नांदगावकर जनतेकडून करण्यात येत आहे.
हुतात्मा चौकात दिशादर्शक फलक बसवावा >
- नांदगाव शहरातून जाणारा महामार्ग मनमाड मालेगाव येथून येतो इथून येणाऱ्या नागरिकांना पूर्वीच्या रेल्वे गेट ची सवय असल्याने अनेक अवजड वाहने त्याच दिशेने जातात. मात्र गेल्या दोन वर्षापासून येथील रेल्वे गेट काढून रेल्वेने सबवे अर्थात भुयारी मार्ग बनविला आहे .या महामार्गातून अवजड वाहने जाण्यास मनाई आहे. मात्र याची अनेक वाहनचालकांना माहिती नसल्याने अनेक वाहने सभेपर्यंत जाऊन पुन्हा माघारी घ्यावी लागतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते हा प्रकार थांबवण्यासाठी हुतात्मा चौकात दिशादर्शक फलक लावावे यावर स्पष्टपणे भुयारी मार्गाकडे व उड्डाणपुलाकडे असा उल्लेख करावा अशी नांदगावकरांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment