नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुम कांदे प्रत्येक वर्षी न. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शालेय साहित्याचे वाटप करत असतात. शुक्रवारी दि. १८ ऑगस्ट रोजी शिवनेरी शासकीय विश्रागृह येथे नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात होते. या वेळी सौ.अंजुम कांदे यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क आहे .पण त्यासाठी त्याला वातावरणही तसेच पाहिजे. म्हणून लवकरच सर्व विद्यार्थ्यांना नूतन शाळा इमारत पाहायला मिळणार असल्याचे सांगितले.
सौ. अंजुम कांदे यांनी मागील वर्षी सर्व शाळांची पाहणी केली होती .या पाहणी दरम्यान सर्व शाळांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय दयनी असल्याचे त्यांच्या लक्षात आले . ही बाब त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांना सांगितल्यानंतर तात्काळ नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळांकरिता दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या सर्व शाळांची काम प्रगतीपथावर असून बहुतेक शाळांची कामे पूर्णत्वाकडे आहे.
नांदगाव येथील गांधीनगर न .प .शाळेचे सुरू असलेल्या कामावर सौ अंजुम कांदे यांनी भेट दिली असता कामाची पाहणी केली.
याप्रसंगी सौ.अंजुम कांदे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उज्वला खाडे, तालुका प्रमुख विद्या जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे, तसेच नगरपरिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र मोरे, शाहिद अख्तर, दीपक मोरे , गंभीर त्रंबक अहिरे, नगर पालिकेचे गणेश पाटील, व इतर मराठी व उर्दू माध्यमाचे शिक्षक वृंद उपस्थित होते तर सूत्रसंचालन राजेंद्र मोरे सरांनी केले.
No comments:
Post a Comment