नांदगाव ( प्रतिनिधी) - अनेक दिवसांपासून शेतकरी राजा पावसाकडे आस लावून बसला असून पाऊस नसल्यामुळे तो हवालदिल झाला आहे . अजून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर दुष्काळी परिस्थिती ला सामोरे जावें लागू शकते. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नांदगाव येथे शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे तालुकास्तरीय सर्व विभागांच्या मुख्य अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. अपुरा मॉन्सूनमुळे निर्माण पीक परिस्थिती, शहरातील नगरपरिषद व ग्रामीण भागातील पाणी पुरवठा , शासकीय योजना चा लाभ घेतांना नागरिकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना, चर्चेदरम्यान येणारे इतर अनुषंगिक विषय आढावा घेण्यात आला.
या वेळी येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्यास सूचना केल्या.
निसर्गचक्र आपल्या हातात नसले तरी येणाऱ्या काळातील संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने हिरीरीने काम करावे असे आवाहन वजा सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी तहसीलदार, बिडीओ, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, महावितरण, भूमी अभिलेख, इरिगेशनचे, पंचायत समिती, तहसील, बांधकाम विभाग, नगरपालिका उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना करताना)
------------------------------------------
- पाणीटंचाई , चारा याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना >
नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी टँकरचे प्रस्ताव तयार करावें, धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, अशा सूचना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आढावा बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
शासकीय विश्रागृहावरील हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात नांदगाव तालुका पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली.
No comments:
Post a Comment