नांदगाव (प्रतिनिधी) - पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटल्या नंतर ही नांदगांव मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात समाधान कारक पाऊस झालेला नाही. पावसा अभावी पिके करपू लागली असून शहरा पासून गाव खेड्या पर्यंत पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे.पाऊस पडावा यासाठी नांदगावला ईदगाह मैदानावर विशेष सामूहिक नमाजचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नांदगाव शहरातील मौलानाच्या नेतृत्वाखाली विशेष नमाज अदा करून पावसासाठी दुवा करण्यात आली. मनमाड शहरातील सर्व मस्जिदी मध्ये सलग तीन दिवस विशेष नमाज आणि दुवा करण्यात आली . ईदगाह मैदानावर रमजान ईद आणि बकरी ईद ह्या दोनच नमाज अदा केल्या जातात मात्र नैसर्गिक आपत्ती आल्यास ती दूर व्हावी यासाठी विशेष नमाज अदा केली जाते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment