नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयाचे शिक्षक किशोर शंकरराव बागले (५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली आहे.काही महिन्यांपूर्वी त्यांची मणक्याची शस्रक्रिया झाली होती तेंव्हा पासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर मंगळवारी रात्री नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. नांदगाव येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, सुनील कासलीवाल, जे.टी.कासलीवाल स्कूलचे प्राचार्य मनी चावला, कासलीवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार,शिक्षक, यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment