नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव बस स्थानकाजवळ सोमवारी दि. ७ अॉगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज( ठाकरवाडी ) या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी मुले - मुली हे घरी जाण्यासाठी एस.टी.बस मध्ये बसण्यासाठी गेले. तेथील एसटी महामंडळाच्या वाहतूक निरीक्षक अधिकारी विनोद इपर यांनी विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यास मजाव करून विरोध केला.त्यावरून शालेय विद्यार्थ्यांनी जाब विचारला असता , त्याचा राग येऊन अधिवासी विद्यार्थ्यांना जातीवाचक अशोभनीय शिवीगाळ करून विद्यार्थ्यांना दमदाटी,शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात घडली.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच आदिवासी समाज संघटना कार्यकर्त्यांनी बस स्थानकात धाव घेतली . सहायक वाहतूक निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी मोठा जमाव बसस्थानकात जमा झाला. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी करत घटनेचा व्हिडिओ तपासून संबंधितांवर गुन्हा रजिस्टर नंबर ३३३ भांदवी कलम २९४, ३२३,५०४,५०६,गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर अधिवासी बांधवांचा जमाव माघारी फिरला. नांदगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजु मोरे पुढील तपास करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment