नांदगाव( प्रतिनिधी) - नागपंचमी व पहिला श्रावणी सोमवार ५० वर्षांनी पहिल्यांदाच असा योग आल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या शुभ सणावर महिलांनी नागदेवतेची मंदिरात पूजा केली.तर काही ठिकाणी वारुळा जवळ पूजा करत नाग देवतेला दूध व लाया अर्पण करून पूजन करण्यात आले.
मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फळ प्राप्त होते. तर दुसरीकडे राज्यभरात पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी असल्याने मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.
नांदगाव येथील श्री नांदेश्वर महादेव मंदिरात हजारो भाविकांनी उपस्थितीती लावली. उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांत समाधानाचे वातावरण दिसत होते.
पहाटे नांदेश्वर महादेव मंडळाचे सेवेकरी यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर मुर्तीची विधीवत पूजा करण्यात आली.दुपारी शहरातून जय नांदेश्वर महाराज यांच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.सायंकाळी मंदिराच्या परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे पासूनच दर्शनासाठी जय नांदेश्वर महादेव मंदिरात खास करून महिलांची मोठी गर्दी झाली होती.
No comments:
Post a Comment