नांदगाव (प्रतिनिधी ) - नागपंचमी निमित्ताने नांदगाव मधील सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक व्ही.पी.सावंत सर यांच्या मार्गदर्शनाने सर्पमित्र विजय बडोदे यांनी सापाबद्दल अंधश्रद्धा सर्पदंश झाल्यावर काय करावे सापांचे किती जाती आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. नाग मण्यार घोणस फुरसे हे विषारी साप आहे बाकी बिनविषारी साप आहे अशी सर्प जनजागृती करण्यात आली . साप हा शत्रू नाही आपला मित्र आहे. उंदीर आपल्या घरात शेतात अन्नधान्याची नासाडी करतात . त्यांना कमी प्रमाणात करणारे हे साप जमिनीचा महत्वाचं घटक आहे . समतोल राखतो सापाला केस असतात साप दूध पितो सापाला मारताना थोडासा लागलं आणि तो बचावला तर डोक धरतो सापाच्या डोक्यावर मणी असतो ही सगळी अंधश्रद्धा आहे असं काही नसतं . साप चावल्यावर मांत्रीका कडे गेलो तर मंत्र मारून आणलं का माणूस वाचतो हे सगळं चुकीच आहे .सर्पदंश झाल्यावर एक उपचार आहे, आपल्या आरोग्य रुग्णालयात अँटिव्हीनियं मोफत मिळते अशी माहिती देण्यात आली .साप दिसल्यावर सापाला मारू नका सर्पमित्रणा संपर्क करा अशी माहीती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली . शाळेकडून सर्पमित्र विजय बडोदे यांचा श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार कण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment