नांदगांव( प्रतिनिधी) - विधी व न्याय विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय लोकआदालत चे आयोजन केले जाते. यामध्ये जास्तीत जास्त दाखल व दाखल पूर्व तडजोड होण्यासारखी प्रकरणे ठेवली जातात. लोक आदालत म्हणजे "पीपल्स कोर्ट" असे सामान्यतः ओळखले जाते. या लोकआदालतींचा उद्देश जनतेला त्याच्या समस्यां सोडवण्यासाठी तडजोडीच्या माध्यमातून केलेला एक प्रयत्न आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त तडजोड योग्य प्रकरणात न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो, न्यायिक प्रक्रियेच्या सर्व स्तरांवरील विचारात्मक सुलभता यात असते असे मत न्या. एस व्ही लाड यांनी नोंदविले.
नांदगांव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाखल असलेली ३८१२ प्रकरणांपैकी तडजोड योग्य ११२४ प्रकरणे व इतर दाखल पूर्व २६८८ प्रकरणे लोक न्यायालयात ठेवण्यात आली होती. त्या मधील ३२२ प्रकरणे निकालीवरून निघाली असून त्यातुन १४ लाख ११ एजार ८३७ रुपये थकबाकी वसुली झाली आहे यात, शहरातिल बंँका,विजवितरण कंपनी,आणी ग्रांमपंचायत थकबाकी यांचा समावेश आहे .यातील वीज कंपनीला कोणतीच वसुली झाली नाही
नांदगांव न्यायालयात दि. ९ सप्टेंबर रोजी लोकन्यायालय दरबार घेण्यात आला होता. या झालेल्या तडजोडी मध्ये वीज वितरण कंपनीला ग्राहकांनी ठेंगा दाखविला म्हणजे ग्राहक त्यांचे कडे फिरकले नाही.
तर फौजदारी खटल्यातील १४६ पैकी ३२ गुन्हे निकालीवरून काढले.दिवाणी मध्ये १०० पैकी ३० गुन्हे निकालीवरून निघाले. ग्रामपंचायत थकबाकी मध्ये १९९५ पैकी २५७ केस निकालीवरून निघाले.बँका मध्ये ४८० पैकी फक्त ३ केस निकालीवरून निघाल्या आणी महावितरण कंपनीची २१३ पैकी एक ही केस निकाली निघाली नाही .
यात विशेष बाब म्हणजे न्यायमूर्ती श्रीमती एस. व्ही . लाड यांनी सर्व प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांच्यात तडजोड होणे कामे जास्तीत जास्त प्रयत्न केला.
त्यामुळे पती पत्नीचे वाद असलेल्या सात व चेक बाऊन्सचे दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली.
त्यामुळे सात मुली संसारात नांदाण्यासाठी सासरी गेल्या. या प्रसंगी न्यायालयीन कर्मचारी व वकील संघाचे सदस्यांनी वादी प्रतिवादी यांच्या केसेस निकाली काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. दरम्यान या प्रसंगी अँड सचिन साळवे, दिपक शिंदे यांनी या संदर्भातील न्यायालयीन कामकाजात विशेष सहकार्य केले. या दरम्यान पक्षकारांनी तडजोडीस विशेष प्राधान्य दिले.
न्यायालयाच्या आवारात न्यायडोंगरी येथील ८० वर्षाच्या जेष्ठ महिलेचा लहाणग्या बाळासारखे उचलून न्यायलायात जबाब नोंदविला. या दरम्यान ज्येष्ठ नागरीका मध्ये पुरुष महिला, यांचे प्रमाण अधिक होते. याच दरम्यान शहरातील प्रतिष्ठित व नामवंत कुटंबातील पुरुष व महिला यांनी देखील आपल्या गुन्ह्याचे संदर्भात न्यायलायात सखोल चर्चा करून तडजोड केली.
No comments:
Post a Comment