नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील एच. आर. हायस्कूलमध्ये ईद-ए-मिलाद शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र साजरा केला. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली.
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती, ईद- ए-मिलाद निमित्त नांदगाव शहरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभागी होत एकतेचा संदेश देत शिस्तबद्ध पद्धतीने ईद साजरी केली.
हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली . शहरातील प्रमुख मार्गाने जात हुतात्मा चौकात वीरगती प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौक, अहिल्यादेवी चौक मार्गाने जात एच. आर. हायस्कूल येथे मिरवणूक सांगता करण्यात आली.
यावेळी सर्वत्र सुख-शांती टिकून राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. एच. आर. हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. येथे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे तर पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, संजीव धामणे , वाल्मिकी जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रावण आढव, मनोद चोपडे , संतोष गुप्ता व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावेळी नासिर पठाण, जावेद शेख , याकुब शेख, बबलू सैय्यद, आबिद सय्यद, शरिफ शेख, अकिल मास्टर, कलिम भाई , मज्जू शेख, मोसिन खाटिक , तर अँड.युनूस शेख यांसह आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment