नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आलेले दुष्काळाचे सावट पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार सुहास आण्णा कांदे यांनी घेतला आहे.वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध लोकपयोगी सुविधांचे लोकार्पण करण्यात येत आहे .आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेत लोकार्पण होत आहे . त्यात ९ जलरथ ( पाण्याचे टँकर), ३ नवीन सुसज्ज रुग्णवाहिका, मोफत फिरता दवाखाना, मोफत शासकीय सुविधा,२ वैकुंठ रथ उपलब्ध होणार आहेत. दीव्यांग व्यक्तीकरीता १०० सायकल, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वतंत्र बसचा लोकार्पण बुधवारी दि. ६ सप्टेंबर रोजी नांदगाव शहरातील गुप्ता लॉन्स येथे सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
आमदार सुहास कांदे नागरिकांच्या भेटीसाठी नांदगाव निवासस्थानी उपस्थित राहणार असून, कोणीही पुष्पगुच्छ, हार तुरे आणू नये असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.
- मनमाड मध्ये भव्य रोजगार मेळावा >
मनमाड मध्ये मंगळवारी दि. ५ सप्टेंबर रोजी शिवसेना संपर्क कार्यालयं येथे भव्य रोजगार मेळावा होणार आहे. मतदारसंघातील जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यात अनेक बेरोजगार तरुण - तरुणींना हाताला काम मिळणार आहे. नाशिक मधील अनेक नामांकित खासगी कंपनीत नोकरी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment