नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कांद्यावर लावलेले निर्यातशुल्क रद्द करावे , मराठा आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नांदगाव तालुक्यातील न्याडोंगरी बंद तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला. तर नांदगाव जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला तर सुमारे तासभर रास्ता रोको करण्यात आला . यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
No comments:
Post a Comment