वाखारी, नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील वाखारी येथे किसान माध्यमिक विद्यालयात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रंगमंचावरील छताच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व भरत आहिरे यांच्या स्वखर्चातून सदर बांधकाम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आहिरे सर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष विजय चोपडा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीष चव्हाण हे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडू खालकर सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विजय चोपडा यांच्या हस्ते भरत आहिरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक प्रतिनिधी सुनील हिंगमीरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नंदू दवांगे, प्रशांत वाघ, समाधान सोनवणे हे उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील एकवीरा ग्राउंडवर भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा दारा कंपनी आयोजित" मुज्जुभाई चष...
No comments:
Post a Comment