Monday, September 11, 2023

मच्छीमार बांधवांनी गिरणा नदीपात्रात सोडले मत्स्यबीज,


नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून गिरणा धरणात मस्त्यबीज सोडण्यात आले. गिरणा धरण परिसरातील आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी या धरणात मत्स्यबीज सोडण्यात आली. मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव मच्छी व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. 
   आंध्र प्रदेश येथून कटला जातीचे मत्स्य बीज मागवले गेले असून, १० लाख बीज धरणात या वेळी सोडण्यात आले आहे. पाच ते सहा महिन्यात हा मासा मासेमारी करिता तयार होतो. गेली काही दिवस माश्यांची संख्या कमी झाली होती. म्हणून मच्छिमार बांधवांचा उदरनिर्वाह करिता हे बीज सोडण्यात आले आहेत. 
  स्थानिक मच्छिमार बांधवांना या ठिकाणी मच्छीमारी करण्याचा प्रथम हक्क अशी भूमिका काही दिवसांपूर्वीच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मोठे आंदोलनात केली होती . 
       या मुळे स्थानिक मच्छीमार बांधव आनंदात असून ग्राहकांच्या मागणीनुसार संबंधित जातीचे मत्स्य बीज धरणात सोडले असल्याने भविष्यातील चिंता दूर झाल्याचे त्यांनी या वेळी बोलून दाखवले. आजपर्यंत स्थानिक मच्छिमार बांधवाना मच्छीमारी करिता विविध अडचणी आल्या पण आण्णांनी ठामपणे यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना आधार दिल्यानंतर मात्र हा समाज बांधव आनंदात आहे .
       या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, सुरेशजी शेलार, बापू शेलार, देवेंद्र शेलार, गोरख बाबा ठोके, सौ.रोहिणी मोरे, राजेंद्र मोरे सर, संजय मोरे ,समाधान गायकवाड, दीपक पवार ,राजाराम गायकवाड,हरीश ढोले,शांताराम वाघ,केवळ वाघ,शिवाजी वाघ,रतन मोरे, भुरा सोनवणे,संदीप शिवदे,काशिनाथ ढोले,बाळू शिवदे,युवराज शिवदे,बापू बोरसे,दादाजी बोरसे,बाजीराव पवार, मांगु गोरे, भागचंद गोरे,गोपाळ ढोले आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आमदार सुहास कांदे व उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुम कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा, ८ किलो वजनाचे चांदीचे विविध अलंकार अर्पण !!

नांदगाव (प्रतिनिधी)  -  नांदगाव येथील ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव बुधवार (दि.१) पासून मोठ्या उ...