Saturday, September 23, 2023

हिसवळ खुर्द येथे रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम,




 हिसवळ खुर्द (प्रतिनिधी ) - हिसवळ खुर्द येथे  आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन ११८ नवीन रेशनकार्ड विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने त्याचे वाटपाचा कार्यक्रम  गणपती मंदिर सभागृहात पार पडला .आमदार आपल्या दारी अंतर्गत मोफत शासकीय सुविधा कार्यालय माध्यमातून विविध शासकीय दाखले व रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जात आहेत.
आता पर्यंत हजारो नागरिकांना मोफत रेशन कार्ड व विविध दाखले उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  याप्रसंगी  मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते राजेंद्र पवार, सदस्य  डॉ.विजय कदम, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, माजी सभापती सुधीर देशमुख, माजी सभापती किशोर लहाने, माजी सभापती अंकुश कातकडे,सोपान बिन्नर, सागर आहेर  आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संजय आहेर यांनी केले,या प्रसंगी त्यांनी पुढील कामांची माहिती सांगितली , आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन आजपर्यंत गावात पूर्ण झालेली व मंजूर कामे जवळपास दोन कोटी रुपयांची आहेत. तर अनेक कामे प्रस्तावित आहेत. कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून एकाच वेळी दोनशे शेततळे करण्याचा निर्धार या गावाने केला आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मंजूर आहे. या ठिकाणी तीन वर्षांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहे. यामुळे परिसरातील अठरा वर्षा वरील वयोगटातील मुलांना प्रशिक्षण घेण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी माजी सरपंच विजय आहेर, मोहनदादा आहेर, विश्वास आहेर, मुकुंद बाबा पालीमकर, ग्रामपंचायत सदस्य- नानासाहेब आहेर, संतोष आहेर, संदिप कदम,सुदाम आहेर,संदिप आहेर, संदिप लोखंडे, ग्रामसेवक मनिष भाबड, विशाल काळे, रितेश आहेर, मंगेश आहेर, सुरेश सोळसे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...