नांदगाव ( प्रतिनिधी) - आमदार सुहास अण्णा रहेनुमा फाउंडेशन नांदगाव व एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मोफत फिरता दवाखाना तसेच शिबिराचे आयोजन करण्यात आले. एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव येथून सर्व प्रकारच्या तज्ञ डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते . यामध्ये हृदयरोग तज्ञ, अस्तिरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल सर्जरी,असे विविध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते. या वेळी सर्वच नागरिकांची रक्तदाब तपासून घेण्यात आला.
यात एकूण ४७३ नागरिकांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला, डोळे तपासणी व यामध्ये ३२७ चष्मे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख किरण देवरे, जेष्ठ नेते विष्णू निकम सर, बाजार समिती संचालक बाळासाहेब कवडे, माजी नगरसेवक इकबाल शेख, याकूब शेख, चिराग भाई शेख, सबदर अली सैय्यद, शशिकांत सोनवणे आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनचे अध्यक्ष सईद हाजी, अय्याज शेख,इकबाल भाई शेख मोहसीन दफेदार, रियाज शेख, लल्लू टेलर, प्रकाश शिंदे, नसीर खतीब, नईम शेख, सुनील जाधव, आरिफ शेख, वसीम पठाण ,इम्तियाज भाई परवेझ शेख, नदीम तांबोळी ,इमरान शेख आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment