Thursday, October 12, 2023

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रसादभैय्या सोनवणे यांची नियुक्ती,




नांदगाव (प्रतिनिधी ) - मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,अन्न,नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार व मुंबई प्रांताध्यक्ष समीर भुजबळ, उत्तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, प्रदेश सरचिटनिस दिलीपआण्णा खैरे, नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते नांदगाव तालुक्याचे युवा नेते प्रसादभैय्या सोनवणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
     नांदगाव तालुक्यातून श्रीगणेशा करत, जिल्हा पातळीवर भुजबळ कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाने याआधी प्रसादभैय्या सोनवणेंनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे, नाशिक जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच जिल्हा शेतकीय समितीवरही ते कार्यरत आहेत. आपल्या कार्य कर्तुत्वाने या पदांमार्फत जिल्ह्यावर ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणूनच आता अवघ्या वयाच्या २६ व्या वर्षी राज्याच्या राजकारणात प्रवेश करत, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार यांसारख्या बड्या जिल्ह्यांची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या विश्वासाने टाकलेली दिसते. सोनवणेंचा इतिहास बघता, राज्यव्यापी कॉपीमुक्त अभियान ईथपासून ते राज्यस्तरीय शिष्यवृत्ती समस्या, विद्यापीठ विरोधी लढे असे अनेक राज्यव्यापी लढे, आंदोलने उभारत राज्यातील विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनात विश्वास तयार केलेला दिसतो.
  याच कामांची दखल घेत, भुजबळ परिवार प्रसादभैय्या सोनवणेंसाठी कायम आग्रही राहत, पाठीवरती थाप देतांना वेळोवेळी आपण सर्वांनी बघितला आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त काम, जास्तीत जास्त पक्षाच्या कामात सक्रीय राहत, उत्तुंग भरारी घेत उत्तर महाराष्ट्राचे पदाचे मानकरी प्रसादभैय्या सोनवणे या चर्चेला उधाण आले आहे. या निवडीमुळे प्रसादभैय्या सोनवणेंचे सर्वत्र स्वागत होत आहे. पक्षातील वरिष्ठ, कार्यकर्ता, युवक आणि विद्यार्थी वर्गाकडून कौतुक होत आहे.
       निवडीनंतर प्रसादभैय्या सोनवणेंनी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,  माजी खासदार व पक्षाचे मुंबई प्रांताध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ व प्रदेश सरचिटणीस दिलीपआण्णा खैरे यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....