Saturday, October 14, 2023

आंतरजिल्हा महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत नाशिकच्या एचपीटी महाविद्यालय मुलीच्या संघाने पटकावले विजेतेपद, तर बी वाय के महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक,

छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर 



नांदगाव ( प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शारीरिक शिक्षण क्रीडा मंडळ पुणे, नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल मुली क्रीडा स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या.
   या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण बारा संघांनी प्रवेश घेतला होता. आंतर महाविद्यालयीन मुली क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रीतम चौधरी पोलीस निरीक्षक यांनी आरोग्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे व त्यासाठी क्रीडा स्पर्धा या गरजेच्या आहेत या स्पर्धेतून खेळाडूची क्षमता व प्रगती तपासता येते जेणेकरून खेळाडू स्पर्धेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी तयार होतो असे उपस्थित खेळाडूंना संबोधित केले. त्याचबरोबर शरद पाटील - स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य यांनी खेळाडूंना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे सर यांनी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व, सध्याचे खेळाडू, त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच सध्याच्या खेळाडूंची मानसिकता यावर संबोधित केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. एल.एम. गळदगे यांनी सर्वांचे आभार मानून करण्यात आले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एचपीटी महाविद्यालय व बी वाय के महाविद्यालय नाशिक यांच्यात चुरशीचा सामना होऊन एचपीटी महाविद्यालयाने जिल्हा आंतर महाविद्यालयीन फुटबॉल मुली स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर बी वाय के महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला. या सामन्यासाठी पंच म्हणून रहीम पठाण व त्यांचे सहकारी यांनी काम केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे, उपप्राचार्य डॉ एस ए मराठे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक एल. एम. गळदगे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....