नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) - शनिवारी आलेली आमवस्यामुळे नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान भारतातील साडेतीन शनिपिठांपैकी पुर्ण पीठ असलेले श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील शनी महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.यावर्षी नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे संकट उभे राहिले असून, त्या संकटातून सावरण्याची शक्ती सर्वांना दे अशी विनवणी करत हजारो भाविकांनी शनी देवाच्या चरणी नतमस्तक झाले.
शनिवारी अमावस्यामुळे दिवसभर असल्याने अनेक भाविक पहाटे पासूनच दर्शनासाठी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत अमावस्या असल्याने दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.नांदगाव तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने दुष्काळ परिस्थिती ओढवली असली तरी शनी देवांचे महात्म्य नाकारता येत नाही. दुष्काळचे सावट जाणवत असले तरी परिसरातून अनेक भागातून पायी दिंड्या शनी महाराज यांच्या दर्शनासाठी नस्तनपूर नगरीत दाखल झाल्या होत्या.ओम श्री शनेचराय नमः, शनी महाराज कि जय' चा नारा देत मंदिर परिसर दणाणून गेला होता . आरतीचे व महापूजेच मानकरी कोपरगाव येथील उद्योग पती निलेश जपे व सौ . जपे तर भाविकांना मधून चिंचविहिर येथील पांडुरंग विठ्ठल तुरकूने दांपत्य होते. या प्रसंगी शनी महाराज संस्थानचे सरचिटणीस माजी आमदार अनिल आहेर , विश्वस्त उदय पवार,खासेराव सुर्वे, नांदगाव बाजार समितीचे संचालक दर्शन आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
यात्रा काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संस्थांनच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येऊन भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यात जागोजागी पिण्यासाठी थंड पाणी, वैद्यकीय सुविधा,दर्शनासाठी सावली,देणगी स्टॉल ,इत्यादी तर मिठाई , प्रसाद, खाद्य पदार्थांची तसेच लहान मुलांच्या खेळणी ची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती त्यामुळे भाविकांनी यात्रेचा लाभ घेतला . यात्रा - उत्सव शांततेत पार पडावी म्हणून यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ शरदचंद्र आहेर, संदीप मवाळ, हरेश्वर सुर्वे, सुनिल पवार, भैया पाटील, भास्कर सोळसे यांचे बरोबरच संस्थान चे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment