Friday, October 20, 2023

नांदगाव येथील कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ.भारती पवार यांना दाखवले काळे झेंडे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी,




नांदगाव (प्रतिनिधी ) - मेरी माटी मेरा देश अंतर्गत  नांदगाव येथील कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री खासदार डॉ. भारती पवार यांना मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने केली जात असून, राज्यात मनोज जरांगे पाटील हे विविध ठिकाणी जाऊन सरकारकडे मागणी लावून धरत आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांचा विरोध होतोय . 
       नांदगाव  येथील कार्यालयात काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता केंद्राची काय भुमिका आहे असा सवाल करत भिमराज लोखंडे,  विशाल वडघुले, परेश राऊत यांनी  आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भारती पवार यांनी शहिदांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्याना मी विरोधकच म्हणेल त्यांनी संविधानिक मार्गाने आरक्षण मागावे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या आंदोलनकर्त्यांना  यावेळी पोलिसांनी अटक केली. यानंतर भारती पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत तुमच्या भावना मी नक्कीच वरपर्यंत पोहचवेल असे आश्वासन दिले. यावेळी भाजपच्या अॅड. जयश्रीताई दौंड, नांदगाव शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, तालुका अध्यक्ष मनिषा  काकड, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे,  पंकज खताळ पाटील , नांदगाव तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, दिनेश दिंडे, भाऊराव निकम, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी शिरसाट, इंदिरा ताई बनकर, संदीप नलावडे, सतीश शिंदे, राजाभाऊ गांगुर्डे, भारत काकड सर, राजाभाऊ पवार, डॉ. आहेर आदी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...