नांदगाव (प्रतिनिधी ) - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकूण ११०९ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी व शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ही प्रकरणे जमा करण्यात आली होती.
सर्व सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही, या अनेक अडचणी येतात, कधी कधी सामान्य जनतेला योजनाच माहीत पडत नाही तर कागदपत्र करायला समजत नाही अशा अनेक अडचणी लक्षात घेऊन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी थेट गावा गावात शासन आपल्या दारी हे अभियान सुरू केले. या अभियानास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत अनेक सुविधांचा लाभ घेतला. ११०९ लाभार्थी महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे.
शासान आपल्या दारी च्या माध्यमातून मतदारसंघातील गावो गावी जातून कॅम्प लावण्यात आले, या ठिकाणी गावातील संजय गांधी निराधार योजनेतील समाविष्ट होणारे प्रकरण जमा करण्यात आली. या सर्व जमा प्रकरणे निकाली काढण्यासाठी समितीचे अध्यक्ष किरण देवरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत एकूण ११४३ प्रकरणे होती यात ३४ प्रकरणे कागदपत्र अभावी अपात्र ठरली . उर्वरित ११०९ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. योजना पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून प्रती महिना १५०० रुपये मानधन मिळणार आहे.
या प्रसंगी सदस्य राजेंद्र पवार, निळू मामा सानप, गुलाब चव्हाण, लक्ष्मण खुरसने, ताराबाई सोनवणे, विजय ईप्पर, काळू शिंदे , गणेश शिंदे, आशुतोष जाधव, तसेच तहसीलदार सिध्दार्थ मोरे, नायब तहसीलदार योगेश पाटील, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, विस्तार अधिकारी मांडवडे , प्रमोद मोरे, वसंत महिरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment