नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती व शास्त्रीय निकष ह्या सर्व बाबींमध्ये नांदगाव तालुका तंतोतंत बसत असतानाही शासनाने ट्रिगर -२ अंतर्गत नांदगावचा समावेश केलेला नाही. ही बाब काल मुंबई येथे शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यात आली. कांदा अनुदान, शेतीमालाचे घसरलेले भाव, निर्यातशुल्क, जीवनावश्यक वस्तूंची महागाई ह्या प्रश्नावर चर्चा करून जनतेला न्याय मिळावा असे गाऱ्हाणं त्यांच्या पुढे मांडण्यात आले.यावेळी बैठकीप्रसंगी उपस्थित असलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांनी दुष्काळासंदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून तातडीने ट्विट केले. व नांदगावच्या दुष्काळाबाबत संसदेत आवाज उठविला जाईल असे पक्षाच्या तालुक्यातील शिष्टमंडळाला आश्वासित केले.
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या तालुक्याला वगळण्यात आले आहे. अवर्षणामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. हे लक्षात घेता या तालुक्याचा फेरअहवाल जिल्हा दुष्काळ देखरेख समितीमार्फत मागवून तो मंजूर करुन घेण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, येथे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी सादरीकरण केले. त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे बैठक सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांना टॅग करीत ट्विट केलं . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नांदगावच्या दुष्कळाबाबत चिंता व्यक्त करीत शासनस्तरावर सर्वोतपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. दुष्कळाबाबत नांदगाव तालुका राष्ट्रवादीकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे .
या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, हेमंत टकले, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सलक्षणा सलगर, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, यांच्यासह अनिल वाघ,निलेश चव्हाण, मच्छिंद्र वाघ, अशोक निकम आदीची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment