नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगांव तालुक्यातील खरीप हंगाम २०२३ हा अवर्षणामुळे वाया गेला असुनही तालुक्याचा समावेश ट्रिगर -२ अंतर्गत घोषित ४२ तालुक्यात नसल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. प्रसार माध्यमातील बातमीनुसार राज्य कृषि विभागाने शासनाकडे पाठविलेल्या दुष्काळग्रस्त ४२ तालुक्यांच्या यादीत नांदगांवचा समावेश नसल्याचे समजते. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य जनता आणि एकूणच सर्व बाजारपेठ हवालदिल झाली आहे. ह्या पार्श्वभूमी वर प्रशासनास जाब विचारण्वयासाठी व तालुक्यातील जनतेला न्याय मिळावा ह्या करिता येत्या गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून नवीन तहसिल कार्यालय नांदगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) गटाकडून लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष महेद्र बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment