नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगांव शहरातील शनि चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती चे आयोजन भाजप शहराअध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी केले. या प्रसंगी जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेेस भाजप पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. भा.ज.पा च्या जयेष्ठ नेत्या जयश्री ताई दौंड यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . मनोज शर्मा यांनी स्व. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन्ही महापुरुषांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले . राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे....स्व. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी अमर रहे.... भारत माता की जय....वंदे मातरम् ...अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस सतिष शिंदे, दिनेश दिंडे, अरुण राऊत, रवि निकम, संजय मोकळ, धम्मवेदी बनकर, राजु जैन, वंश पटाईत, भाऊ सोनवणे, प्रविण पवार, अलंकार सदगिर आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment