Saturday, November 25, 2023

नांदगाव शहरातील नागरी समस्या आठ दिवसांत न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा ठाकरे गटाचा इशारा,




नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील नागरी समस्या आठ दिवसांत न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे. शहराचे  मुख्याधिकारी विवेक धांडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. नांदगाव शहरात काही महिन्यांपासून रोगराई, डासांचा प्रादुर्भाव, धुळीचे रस्ते, शौचालयाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याविरोधात नांदगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांची भेट घेत चर्चा करून निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या सर्वच भागातील रस्ते धूळमुक्त करावे,
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने उपाययोजना कराव्यात, महात्मा फुले चौकातील दाह ते बारा वर्षांपासून पडून असलेल्या गाळ्यांचे वितरण रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना त्वरित करावे, बंद शौचालये सुरू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
      यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, शहरप्रमुख श्रावण आढाव, महिला आघाडी शहरप्रमुख लता कळमकर, उपशहरप्रमुख चेतन शिंदे, दिलीप नंद, सुभाष कवडे, ज्ञानेश्वर पवार, अतुल कासलीवाल, राहुल दरगुडे, तेजस बोराळे, दिलावर इनामदार, संदीप पांडे, अंबादास कसबे, नाविद शेख, विजय बडोदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...