Saturday, November 25, 2023

किसान विद्यालयात माजी विद्यार्थी व शिक्षकाचा जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा साजरा,





नांदगाव (प्रतिनिधी ) - इयत्ता दहावी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून आज आम्हांला २३ वर्षे झाली, अर्थातच ते साल होते २००० नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे किसान माध्यमिक विद्यालय, वाखारी ता.नांदगांव जि. नाशिक इथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांशी मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. पण व्हॉट्सअँप ग्रुपने आमच्या मैत्रीचा पुर्नजन्म घडवला.
    आमच्या दहावीच्या १९९९-२००० च्या दहावीच्या बॅच चा माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत किसान माध्यमिक विद्यालय येथे साजरा करण्यात आला. गुरुजनांचे आगमन झाल्यानंतर वेलकम ड्रिंक काॅफी देऊन स्वागत करण्यात आले.जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व गुरुजनांचा सुचनेनुसार दहावीच्या वेळेचा नित्यक्रम सुरूवातीला कचरा गोळा करून, नंतर मांडवडेसर, वाघसर व   बागुलसर यांचा आज्ञेनुसार राष्ट्रगीत,"हे परमात्म " प्रार्थना, व प्रतिज्ञा झाली. त्यानंतर ओळीने वर्गात जाऊन वर्गशिक्षक नावरकरसर यांनी हजेरी घेतली. मग कोणत्याही कार्यक्रमासाठी अध्यक्षांची निवड ही गरजेची असते मग आयोजकांनी नियोजन केल्यानुसार अध्यक्ष विजयजी चोपडा यांच्यासह सर्व गुरुजन मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. KMV 1999-2000 X CLASS या व्हाटसप ग्रुप ला पाचवा वर्धापनदिन केक कापून साजरा करण्यात आला. सर्व गुरुजनांचा सन्मान शेला, सन्मानचिन्ह, व मिठाई देऊन करण्यात आला.तसेच विघालयाला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर फोटोफ्रेम देण्यात आली.प्रास्तविक प्रमोद बोडके, सुत्रसंचलन जीवन ठाकरे व प्रदीप बोडके यांनी केले. नंतर अनिल गोटे,सुनिता गोटे, सुवर्णा काकळीज,मच्छिंद्र बोडके,किरण पाटील, हेमंत जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सर्व गुरुजनांनी मार्गदर्शन पर भाषण करीत काही जुन्या आठवणी व जीवनात यशस्वी कसे व्हावे,मैत्री, यावर विचार व्यक्त केले.व अतिशय सुदंर नियोजनाचे कौतुक केले. शालेय समितीचे अध्यक्ष  विजय चोपडा सरांनी मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थी जरी असले तरी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासत केले. नंतर सर्वांनी चवीष्ट स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. गुरूजनांचा हस्ते विघालयात वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख उपस्थिती विजय चोपडा सर(शालेय समिती अध्यक्ष) ,दीपक गणपत बाकळे ( प्रमुख पाहुणे), नरेंद्र रामभाऊ नावरकर,भागचंद भाऊराव मांडवडे,सुभाष विश्वासराव लाड,संजय रघुनाथ वाघ,गोरक्षनाथ रघुनाथ बागुल,विलास यादव काकळीज,राजेंद्र दशरथ भगत,पोपट भीमजी चव्हाण,रमण दादा गोटे,मधुकर माधवराव बोबडे,केसर ससे बटाला,विजय श्रावण नागपुरे,शेखर एकनाथ ढेपे,भाऊसाहेब लक्ष्मण गडाख,वृषाली रामकृष्ण भट,स्वाती दिनकर जोशी,अलका काशिनाथ महाजन,गायत्री समाधान बच्छाव आदी मान्यवर गुरू जन उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सुवर्णा काकळीज व निलेश डोंगरे यांनी खुप मेहनत घेऊन विद्यार्थ्यी व शिक्षकांशी संपर्क करून कार्यक्रमाची रुपरेषा व नियोजनाचे मोलाचं कार्य केले.विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणांत नाचगाणी करत एकमेकांची खोडी काढत स्नेहमेळावा पुढचा वेळेस पुन्हा येईन या इराद्याने साजरा केला.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....