नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव मध्ये संविधान दिन कार्यक्रम तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आणि २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना व निर्दोष नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना जन सामान्य नागरिकांना पर्यंत पोहचवण्यासाठी शनी मंदिर येथे भाजप नांदगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात भा.ज.पा च्या नेत्या ॲड. जयश्रीताई दौंड यांनी सर्व उपस्थितांना संविधान दिनाची माहिती दिली. तसेच सर्वांनी संविधानातील प्रस्तावनेचे वाचन केले. कार्यक्रमास भा.ज.पा जिल्हा सरचिटणीस संजय सानप, भा.ज.पा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, भा.ज.पा शहर उपाध्यक्ष दिपक पाटील, ॲड. बी.आर चौधरी साहेब, बबनराव मोरे, भा.ज.पा शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, सतिष शिंदे, संजय पटेल, ॲड. उमेश सरोदे, दिनेश दिंडे सर, भा.ज.पा महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ.अन्नपूर्णाताई जोशी, सौ.मीनाताई शर्मा, सौ.वर्षाताई शर्मा, सौ.मनिषाताई पाटील, बाळासाहेब बनबेरू, योगेश परदेशी, राजेंद्र कुटे, कोशाध्यक्ष धम्मवेदी बनकर, डॉ.कारभारी आहेर, अनिल बुरकुल, ज्ञानेश्वर बोरसे, नंदकिशोर शर्मा, शाम पांडे, राहुल शर्मा, किरण मोरे, वंश पटाईत, सतिष आहिरे, शिवाजी देवरे, सनी देवरे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी भारतीय राज्य घटनेचे पूजन केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment