नांदगाव (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीची वारियर आणि बुथ प्रमुख बैठक जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. येथील हनुमान टेकडी येथे सदर बैठकिचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपिठावर जिल्हा नेत्या अॅड.जयश्रीताई दोंड, विधानसभा निवडणुक प्रमुख पंकज खताळ, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, जिल्हा विस्तारक दत्ताभाऊ सानप, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन कवडे, जि.चिटणीस डाॅ.राजेंद्र आहेर, एस.सी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी शिरसाठ, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषा काकड, युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक पेंढारकर उपस्थित होते. बैठकी दरम्यान ॲड हिरालाल गांधी, बळवंत शिंदे, सौ. अन्नपुर्णा ताई जोशी, किशोर शिंदे, यासह विविध पक्ष, संघटनाच्या महिलांनी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी पक्षात प्रवेश कर्त्यांचे स्वागत व सत्कार केला. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष वाघ यांनी केंद्र व राज्याच्या विविध योजनांची माहिती देऊन नियुक्ती करण्यात आलेल्या वारियर आणि बुथ प्रमुखांची जबाबदारी व उद्दिष्ट्ये त्यांनी विषेद केली दरम्यान जिल्हा अध्यक्ष वाघ यांची भारत सरकारच्या पी.एम विश्वकर्मा केंद्रीय शासकीय कमिटी वर जिल्हा संयोजक म्हणुन नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार नांदगाव शहराच्या वतीने भा.ज.पा. शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी केला. तर शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा यांचा ही वाढदिवसा निमित्त केक कापून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष दिनेश दिंडे, व्दारकानाथ कलंत्री, भगवान सोनवणे, किरण पैठणकर, हेमा बनबेरू, मिना शर्मा, भुमिका शर्मा, वंदना मोरे, जान्वी शर्मा, तारा शर्मा, विद्या कुलकर्णी, आशा बनबेरू, शुभम सौंदाणे, कृष्णा देहाडराय, सोमनाथ घोगाणे, यश सेठी, सतिष शिंदे, संजय पटेल, पंकज जंगम, दर्शन शर्मा, प्रशांत सोनवणे, सतिष अहिरे, रितेश काकड, भिकन वाघ, भालचंद्र जोशी, गणेश सागर, शांताराम सागर, दिंगबर, कर्डे, अविनाश मगर, रविंद्र गवळे, भूमीका शर्मा यांसह भारतीय जनता पार्टिचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकिचे सूत्रसंचालन भा.ज.पा अनु. जाती शहराध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे व भरत काकड यांनी केले. तर आभार जिल्हा सरचिटणीस संजय सानप यांनी मानले. बैठकिचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment