नांदगाव (प्रतिनिधी) - शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना अत्यंत तुटपुंज्या स्वरुपात मानधन मिळते. यासह अन्न शिजवताना अनेकदा अपघात होऊन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना अपघाती विमा मिळावा यासाठी आधारवड महिला बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यात अध्यक्ष संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही. एक रुपयाचा कढीपत्ता सरकार आमचे बेपत्ता आशा स्वरूपात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिकारी नंदा ठोके यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व वरिष्ठ स्तरावर आम्ही आपल्या मागण्या कळवतो असे आश्वासन दिले. हा मोर्चा छोट्या स्वरूपात काढला आहे , भविष्यात याचे रुद्र रूप धारण करून सरकारला धारेवर धरू असे सोनवणे यांनी यावेळी सांगितले.नांदगाव तालुक्यातील शेकडो महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment