मनमाड (विशेष प्रतिनिधी) - भारतीय रेल्वेच्या वतीने काल अजून सहा वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . यातील जालना ते मुंबई या गाडीचे जालना येथून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. तर मनमाड येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार भुसावळ डिव्हिजनचे डी आर एम इथी पांडे व आमदार नरेंद्र दराडे यांनी स्वागत करून गाडीला पूढे रवाना केले .यावेळी रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात या वंदे भारत रेल्वेचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे ध्वज घेऊन या कार्यक्रमात जल्लोष साजरा केला .कार्यक्रम शासकीय होता की भाजपचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment