नांदगाव ( प्रतिनिधी)- काल मंगळवारी १२ रोजी डिसेंबर लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती दिवस शिवसेनेतर्फे प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गट, नांदगाव शहर, मनमाड शहर व मालेगाव येथील संपर्क कार्यालय या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती दिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
मतदार संघातील विविध ठिकाणी शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. आमदार संपर्क कार्यालय मनमाड शहर, नांदगाव शहर, मालेगाव, भालूर गटातील पानेवाडी, साकोरा गटातील तळवाडे , वेहेळगाव नायडोंगरी , गटातील पळाशी जातेगाव गटातील कासारी या ठिकाणी प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विविध जिल्हा परिषद गट व शहर संपर्क कार्यालय येथे झालेल्या जयंती उत्सवात स्थानिक शिवसेना युवासेना महिला आघाडी प्रतिनिधी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment