नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय इंधन बचत कार्यक्रम नांदगाव येथे दि.१६ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या मासिक काळात इंधन बचत कार्यक्रमाचे उदघाटन नुकतेच नांदगाव डेपो आगारात पार पडले. यावेळी मालेगावचे आर.टी.ओ. भरत भवाळ यांच्या हस्ते इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव आगाराचे डेपो मॅनेजर हेमंत पगार होते . तर प्रमुख अतिथी प्रा. सुरेश नारायणे होते. आर.टी.ओ.भरत भवाळ म्हणाले की, इंधन बचत करणे काळाची गरज आहे. त्यासाठी महामंडळाच्या बस ड्रायव्हर यांनी काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन इंधन बचत कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावे.
गॅस टँकचं झाकण घट्ट लावलेलं नसेल, तरीही तुमची गाडी अपेक्षित मायलेज देणार नाही. गॅस टँकचं झाकण घट्ट लावलं नसेल, तर गाडीतला गॅस लीक होऊ शकतो. याचसाठी गॅस टँकचं झाकण घट्ट लावल्याची खात्री करून घ्या.
गाडी कुठल्याही कारणानं जागीच उभी असेल, तर ती बंद ठेवा. चालू ठेवू नका. त्यामुळेही इंधनाची बचत होईल.
कारच्या अॅक्सलरेटर पॅडेलवर सातत्यानं पण हळूहळू दाब द्या. कारची गती सावकाश वाढवा. विशिष्ट वेगमर्यादेतच गाडी चालवा. त्यामुळे इंधन बचत होईल.तसेच त्यांनी बस कर्मचारी वर्गाशी हितगुज केले.तर हल्ली पेट्रोल, डिझेल, आणि गॅसचा साठा मर्यादित होत चालला आहे. पारंपरिक इंधन संपत्तीचा साठा कमी होत असल्याने सामान्य जनतेने वाहानांचा वापर आवश्यक तेव्हाच करावा. व जनतेने इंधन बचतीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन इंधन बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आठ दिवसांतून एक दिवस वाहनांचा वापर बंद केल्यास इंधन बचतीसाठी नक्कीच हातभार लागेल असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी मनोगतातून व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतातून डेपो मॅनेजर हेमंत पगार यांनी इंधन बचतीसाठी नांदगाव एस.टी.डेपोचे सर्वच कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असतात. मागील काही महिन्यात नांदगाव आगराने इंधन बचत करून नांदगाव आगार नाशिक विभागातुन नफ्यात अव्वलस्थानी असल्याचे सांगितले
.त्याबद्दल नांदगाव आगारातील सर्व कर्मचारी वर्गाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आगार व्यवस्थापक ए.डब्लु.एस. सानप, अरुण इप्पर, डी.पी.जगधने, डी.एम.भाबड,वाहन परीक्षक राजु कटारे, मयुर सुर्यवंशी, विनोद इप्पर तसेच डेपोतील सर्व मॅकिनिक कर्मचारी, सर्व बस वाहक,चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment