नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन सेवक सहकारी सोसायटीच्या सभासदांसाठी दरवर्षी नफ्यातून रुपये १५ लाखांचा अपघाती विमा काढला जातो. मनमाड ते नांदगाव महामार्गाने प्रवास करत असताना माध्यमिक विद्यालय पांझनदेव (ता.नांदगाव) येथील उपशिक्षक कै.प्रशांत माणिक ठाकरे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारस पत्नी श्वेता प्रशांत ठाकरे तसेच त्यांची मुलगी धनश्री प्रशांत ठाकरे,शालक शरद आहिरे व त्यांचे सहकारी शिक्षक अनिल गोरे यांना रु.१५ लाखांचा विमा चेक व संस्थेमार्फत २५ हजार रुपये मदतनिधीचा चेक देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद चव्हाण,व्हा.चेअरमन प्रियंका पाटील, संचालक जिभाऊ खताळ,महेंद्र जाधव,अशोक मार्कंड,संजय पवार,संतोष इप्पर व कर्मचारी शरद देशमुख आणि शुभम सोनेज उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यातील ही माध्यमिक सेवकांची पतसंस्था दरवर्षी संस्थेच्या नफ्यातून सभासदांसाठी अपघाती विमा काढत असते. त्यामुळे अपघातात निधन झालेल्या सभासदास आर्थिक मदत होते. यंदाच्या वर्षासाठीही संस्थेने रु.१५ लाखांचा अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे,असे चेअरमन प्रमोद चव्हाण यांनी सांगितले. या निर्णयाचे सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी स्वागत केले.
No comments:
Post a Comment