Thursday, January 25, 2024

वादग्रस्त पोस्टच्या निषेधार्थ नांदगाव शहर बंदला प्रतिसाद,





नांदगाव ( प्रतिनिधी) - राम मंदिर स्थापनेनंतर सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावतील अशी वादग्रस्त पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम नांदगाव शहरातील काही समाजकंटक हेतू पुरस्कृत करत आहेत . अशांना वेळीच आवर घालावा व असे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवकन्या संगिता सोनवणे सह सकल हिंदू समाजच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या कडे करण्यात आली. नांदगाव शहर बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नांदगाव च्या जनतेने पाठिंबा दिला असुन, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी तात्काळ नांदगाव येथे भेट देऊन हिंदू समाजाच्या भावना जाणून घेतल्या. कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले .नांदगाव शहरात काही समाजकंटक असे कृत्य घडवत आहेत त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असेही अनिकेत भारती यांनी सांगितले, सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहरांतून मोर्चा देखील काढण्यात आला होता.दुपारी तीन वाजेला निवेदन देऊन पोलिस अधीक्षक अनिकेत भारती सह एकत्रितपणे पणे चहा पाणी घेऊन व्यवहार सुरळीत करण्याचे आव्हान करण्यात आले
    अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी हिंदू समाजाच्या भावना जाणून घेतल्या व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सकाळी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. नांदगाव शहर शांतताप्रिय असून, दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, नांदगाव शहरासह ग्रामीण भागातील सात संशयितांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील असा समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखविण्याच्या हेतूने प्रसारित केले म्हणून याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संशयितांना अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक बहाकर तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...