मांडवड (प्रतिनिधी) - शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २४ सप्टेंबर १९६९ ला त्या काळचे शिक्षणमंत्री डॉ.व्ही.के.आर.व्ही. राव यांनी म.गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम सुरू केला. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांना श्रमाचे आणि कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुरु झालेला उपक्रम आज भारतभर ३२लाख. स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना हे एक विद्यार्थ्यांचे संस्कारपीठ बनले आहे. असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले. ते मांडवड येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिररात "राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व " या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.पी.मोरे होते. पाहुण्याचा परिचय व प्रास्ताविक सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीमती के.टी.बागुल यांनी केले. सुरवातीला स्वयंसेविका नम्रता फोडसे हिने राज्यस्तरावरील एन.एस.एस.चे शिबिरातील आलेले अनुभव व आत्मविकास कसा झाला याचे कथन केले. या शिबिरात शंभर स्वयंसेवकांचा सहभाग आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास आणि लोकसंख्या नियंत्रण जागृती व श्रमदानद्वारे शोषखड्डे,वृक्षांना आळे करणे, व समाजप्रबोधन या शिबीरकाळात केले जाणार आहे असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.पी. मोरे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस ॳॅड.नितीन ठाकरे, नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील,प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे, उपप्राचार्य प्रा.डाॅ.संजय मराठे,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.पी.गायकवाड, प्रा.श्रीमती पी.एच.जाधव,प्रा.श्रीमती, के.टी.बागुल,स्व.श.आ.ज.वि.मांडवडच्या मुख्याध्यापक श्रीमती संजीवनी कांबळे, सरपंच अ़कुश हरी डोळे, उपसरपंच सौ.जीजाबाई विठ्ठल आहेर ग्रामसेवक मयुर आहेर व स्वयंसेवक, विलास आहेर, नितीन सरोदे,शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment