नांदगाव ( प्रतिनिधी ) - संविधान सन्मान मेळावा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथे संपन्न झाले.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकच्या नांदगाव मध्ये " जागर लोकशाहीचा, गौरव संविधानाचा " संविधान सन्मान मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी संविधान चौक येथील भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना असलेल्या कोणशीला स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात मान्यवरांचे ढोलताशेंच्या गजरात स्वागत करण्यासाठी कांग्रेसचे शहराध्यक्ष चोपडे यांच्यासह बहुजन समाजबांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे व नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते सामाजिक,क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले . पत्रकार बांधवांना सन्मानाने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुजन समाज बांधवांना समाजिक न्याय मंत्री हंडोरे यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले . तसेच मनोज चोपडे यांना सर्व धर्म समभाव हा पध्दतीने सर्वांना एकत्रित करून आपलं कार्य कायमस्वरूपी चालुच ठेवावे असे मार्गदर्शन केले . भारताचे संविधान हा दीप स्तंभ हजारो वर्ष उर्जा सर्व भातीयांना देत राहो असे जनतेला सांगितले. यावेळी शहरातील महिला वर्ग बहुजन समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment