मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - अखंड हिंदुस्तानाचे कोट्यावधी हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या २२ जानेवारीला अयोध्या येथील भव्य प्रभु श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे . काही दिवसांपूर्वी शिर्डीत महाविकास आघाडीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना व सर्व श्रीराम भक्त यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळ्यास काळ फासण्यात आलं . तसेच महिला आघाडी तर्फे प्रतीकात्मक पुतळ्यस जोडे मारत, प्रभू श्रीराम की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा, आमदार सुहास आण्णा कांदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असे घोषणाबाजी करत, चपलांचा हार टाकून पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना नेते अल्ताफ(बाबा) खान,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, विधानसभा संघटक जाफर मिर्झा,महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, महिला आघाडी शहरप्रमुख संगीता ताई बागुल,विधान सभा संघटक पूजाताई, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले, आझाद पठाण, मिलिंद उबाळे,दिलीप तेजवानी,एजाज शाह, भाजप शहर प्रमुख सचिन सांगवी, बबन फुलवाणी, सुभाष माळवातकर,लाला नागरे,चंद्रकांत आव्हाड,महेंद्र गरुड,दिनेश घुगे, निलेश ताठे, सिद्धार्थ छाजेड, अजिंकीय साळी,स्वराज देशमुख,अज्जू शेख,पिंटू वाघ,लोकेश साबळे,सुनील ताठे,बाबा पठाण,अतुल भंडारी,ऋषिकांत आव्हाड,मनु शेख, कैलास सोनवणे,आसिफ पठाण, अतीक शेख, सागर आव्हाड,इम्तियाज शाह,कुणाल विसापूरकर तसेच महिला आघाडी उपतालुका नाजमाताई मिर्झा, संघटक शहर नीताताई लोंढे, अल्काताई कुमावत, वंदनाताई शिंदे, प्रसिध्दी प्रमुख निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment