नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगांव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे माता सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास आणि तदनंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना पुष्पहार व पुष्प अर्पण करुन करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना भाजपा च्या माजी प्रदेशउपाध्यक्षा ॲड. जयश्रताई दौंड म्हणाल्या समस्त स्त्री वर्गास शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई यांनी मुलींच्या, महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व जाणुन कित्येक स्त्रियांना प्रेरीत केले. त्यांनी महिलांसाठी पुण्यात भारतातील पहिली शाळा सुरु केली. त्या भारताच्या प्रथम शिक्षिका झाल्या, त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढे फातिमा शेख यांनी देखील शिक्षिका प्रशिक्षण घेऊन आणि पदवी प्राप्त करून भारताच्या पहिल्या मुस्लीम महिला शिक्षिका झाल्या.
तसेच भाजपा शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर म्हणाले लवकरच पुण्यात माता सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केलेल्या जागेवर महायुती सरकारतर्फे एक भव्य सुशोभित असे स्मारक होणार आहे . त्या निमित्ताने आज च्या युगातील मुलींना व महिलांना, माता सावित्रीबाई यांचा लढा व त्यातुन प्रेरणा मिळणार आहे. आणि हीच माता सावित्रीबाई फुले यांना खरी श्रद्धांजली असणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा तर्फे करण्यात आले. कार्यक्रमावेळी जयश्रीताई दौंड, राजाभाऊ बनकर, दिपक पाटील, सतिष शिंदे, मनोज शर्मा, गणेश शर्मा, अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, धम्मवेदी बनकर, अमोल चव्हाण, काजल जाधव, परवीन शेख, सरला गोखने, कविता माले, उज्वला लोखंडे, संगीता बागुल, जिजाबाई परदेशी, लता अडकमोल, रेखा सोनवणे, सुमन जाधव, गरुड ताई, जाधव ताई, उषा सोरेसह आदी महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment