नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या शिबिराचे उद्घाटन शहरातील शनी मंदिर गार्डन जवळील सानप ड्रायफ्रूट येथे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर तथा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या शिबिराचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या शिबिरात बाबाजी शिरसाठ, अन्नपूर्णा जोशी, ॲड. मनीषा पाटील, तारा शर्मा, सतिष शिंदे, बळवंत शिंदे, मनोज शर्मा, राजेंद्र गांगुर्डे, दिनेश दिंडे, सुरेश कुमावत, अण्णा काळे, धनराज मंडलीक, शंकर वाघमोडे, रविंद्र सानप, अमोल चव्हाण, धम्मवेदी बनकर आदींची उपस्थिती उपस्थिती होती. यावेळी नाव नोंदणीचा शुभारंभ करण्यात येवून नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस संजय सानप यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment