Wednesday, February 21, 2024

नांदगाव शहरातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांची भाडेकरार लिलाव प्रक्रिया जाहीर,




नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या महात्मा फुले चौकातील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांची जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया मंगळवारी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जैन धर्मशाळा या ठिकाणी सकाळी महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर 2524 मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. या लिलाव प्रक्रियेसाठी इन कॅमेरा व्यवस्था ठेवण्यात येऊन मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी नांदगाव उपस्थित होते.
लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. यावेळी तळमजल्यावरील सर्व गाळ्यांचे, पहिल्या मजल्यावरील सर्व गाड्यांचे, तसेच दुसऱ्या मजल्यावरील दोन गाळ्यांचे लिलाव झाले. यात एकूण ७३ गाळ्यापैकी ४६ गाड्यांचे लिलाव पूर्ण झाले आहेत. यशश्वी सर्वोच्च बोली आसाराम दुबे (रक्कम, 51,40000/-) यांनी लावली. सर्व प्रक्रियेत एकूण ना परतावा अनामत रक्कम ५,५०,५०,०००/- रूपये इतकी बोली लावलेली आहे. यशस्वी बोली धारकांनी व ओटे धारकांनी पुढील पंधरा दिवसात करारनामे करून द्यावे. तसेच शॉपिंग सेंटरची सर्व किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नांदगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, लेखापाल संतोष ढोले, लेखा परीक्षक सतीश कुमार खैरे, प्रकल्प अधिकारी आनंद महिरे, संगणक अभियंता श्रीमती रोशनी मोरे, वरिष्ठ लिपिक विजय कायस्थ, बीबी शिंदे,अरुण निकम, अंबादास सानप,रामकृष्ण चोपडे, आकाश जाधव,दीपक वाघमारे, अनिल पाटील,सुनील पवार, निलेश देवकर,यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी सर्व नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...