Tuesday, February 27, 2024

नांदगाव येथे बाह्य रुग्ण कक्ष (ओपीडीचे) भूमिपूजन ,




नांदगाव (प्रतिनिधी) - मराठा विद्या प्रसारक समाज संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र संचलित बाह्य रुग्ण कक्ष (ओपीडी) भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे नांदगाव तालुका संचालक  अमित  बोरसे पाटील यांनी संस्था संचलित संकुलांमधील नव्याने होत असलेल्या बदलांबाबत तसेच येणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत तसेच विकास कामांंबाबतचे धोरण स्पष्ट केले. तसेच संस्थासंचलित भरपूर विकास कामांसाठी स्थानिक ग्रामस्थ तसेच सभासद बांधवांची मदत होत असल्याचे देखील सांगितले. आयटीआय ही संस्था प्रात्यक्षिक कौशल्यांच्या आधारावर तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावीत असते. त्याचप्रमाणे आय. टी. आयचे विद्यार्थी हे शासकीय सेवेत,सहकारी सेवेत,औद्योगिक क्षेत्रात, उत्कृष्ट व्यावसायिक व उद्योजक बनून अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देत असतो.  सध्याच्या काळात तांत्रिक कौशल्य असणाऱ्या युवकांची अधिक प्रमाणात गरज असल्याने तालुक्यात जास्तीत जास्त व्होकेशनल कोर्सेस साठी जागा उपलब्ध व्हावी व जास्तीत जास्त युवकांना आपले ध्येय साध्य करता यावे . त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने नांदगाव आयटीआय येथे नवीन वास्तूचा भूमिपूजन सोहळा आयोजित करीत असल्याबाबत सांगितले. त्याचप्रमाणे नांदगाव व नाशिक हे अंतर जास्त असल्याने भरपूर गरजूंना छोट्या छोट्या आजारांचे निदान करण्यासाठी नाशिक सारख्या शहरात जावे लागते तसेच काही वेळेला तात्काळ गरज असताना देखील उपचार उपलब्ध होत नाहीत म्हणून नांदगाव तालुका व परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून ओपीडी ची सुरुवात करीत  आहे. प्रत्येक १५ दिवसांनी संस्थेच्या तज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन असल्याबाबत सांगितले. संस्थेचे सरचिटणीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  आजच्या युगात फक्त पुस्तकी ज्ञानाला महत्व नसून आजच्या युगात टिकायचे असेल तर प्रत्येकाजवळ विज्ञानवादी धोरण हवे आणि विज्ञानवादी होण्यासाठी किमान प्रात्यक्षिक कौशल्य असावे . त्यासाठी सर्वोत्तम माध्यम म्हणजे आयटीआय होय असे नमूद केले. त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने विनाअनुदानित सेवकांच्या भरघोस पगारवाढीबद्दल विनाअनुदानित सेवकांमार्फत सरचिटणीस नितीन ठाकरे तसेच पदाधिकारी वर्गाचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जातेगाव येथील मविप्र समाज सभासद बांधव तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जमा केलेल्या दहा लाख रुपये पेक्षा जास्त रकमेचे धनादेश मवीप्र पदाधिकारी तसेच संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत सरचिटणीस अॅडवोकेट नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये मविप्रचे नांदगाव संचालक हे अतिशय कुशल संचालक असून नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त विकास कामे ही नांदगाव तालुक्यात सुरू आहेत .  यासाठी जो पाठपुरावा आहे तो अमित बोरसे सातत्याने करीत असतात . त्याचेच फलित नांदगाव वासियांना अनुभवायला मिळत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष  बाळासाहेब क्षीरसागर यांनी विशद केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अॅडवोकेट  नितीन ठाकरे , संस्थेचे सभापती  बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, उपाध्यक्ष  विश्वास बापूराव मोरे, उपसभापती  देवराम बाबुराव मोगल, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार अॅडवोकेट अनिलदादा आहेर, नाशिक ग्रामीण संचालक  रमेश पांडुरंग पिंगळे, मालेगाव तालुका संचालक  रमेशचंद्र काशिनाथ बच्छाव, सटाणा तालुका संचालक डॉ.प्रसाद प्रभाकर सोनवणे,देवळा संचालक  विजय पगार,नांदगाव संचालक इंजि.  अमित उमेदसिंग बोरसे पाटील, महिला संचालिका श्रीमती शालनताई सोनवणे, सेवक संचालक  जगन्नाथ मधुकर निंबाळकर ,डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र संस्थेचे अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड संचालक  विठ्ठल (आबा) आहेर, व डॉ.पुंजाराम आहेर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  प्रसादभैया सोनवणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल विश्वनाथ बोरसे, न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष  दिलीप देवचंद पाटील, आदर्श प्राथमिक शाळा स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम कारभारी गवांदे तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच नांदगाव तालुक्यातील सर्व संकुलांचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डी. एम. बिलोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य  बी. बी. अत्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल तसेच आदर्श प्राथमिक शाळा या तिन्ही संकुलांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता पसायदान ने करण्यात आली.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...