नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरालगत असलेल्या गिरणानगर येथील माणिक मोरे या आदिवासी तरुणाच्या झापाला आग लागून संसारपयोगी वस्तू त्यात धान्य, सर्व भांडी,कपडे आदी महत्वाच्या गोष्टी जळून खाक झाल्याने त्याचा संसार मोडून पडला. ही गोष्ट गिरणानगर च्या सरपंच सौ.अनिता पवार यांनी तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजुम कांदे यांना कळवली.
सौ.कांदे यांनी लगोलग या कुटूंबाला त्यांच्या निवास्थानी (देवाज ) बंगल्यावर बोलावून घेतले.व या कुटूंबाची आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांना एक क्विंटल धान्य,रोजच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती स्टील ची भांडी,कपडे,देवून त्या कुटूंबाला आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा दिला.या मदतीबाबत या मोरे कुटूंबाने आ.सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उज्वला ताई खाडे, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे, शशी सोनावणे, सुनील जाधव, राहुल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment