Sunday, April 28, 2024

पिंपरखेड येथील जळीतग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास आण्णा कांदे यांचा माणुसकीचा आधार, कुटुंबीयांना संसारोपयोगी साहित्य वाटप,





 नांदगाव ( प्रतिनिधी )  -  नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पिंपरखेड येथील अपादग्रस्त कुटुंबाला धान्य, कपडे, भांडे आदी संसारपयोगी साहित्य देत माणुसकीचा आधार देऊन सामाजिक कृतज्ञता जपली आहे.                       
        पिंपरखेड येथील शंकर मोरे व अर्जुन मोरे यांच्या राहत्या झापाला शॉर्ट सर्किटने आग लागून संसारपयोगी साहित्य मग त्यात धान्य,सर्व वापरात असलेली भांडी,कपडे,आदीसह शेती साहित्य व काही कोंबड्या जळून खाक झाल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला होता.
       ही गोष्ट बाजार समितीचे संचालक जीवन गरुड, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ सोमवंशी व संदीप मवाळ यांनी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना कळवली.
    आमदार सुहास अण्णा कांदे यांनी लगोलग या कुटूंबाला त्यांच्या निवास्थानी (देवाज ) बंगल्यावर बोलावून घेतले या कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना ५० किलो गहू, ५० किलो तांदूळ, रोजच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती स्टील ची भांडी,कपडे,देवून त्या कुटूंबाला आधार दिला. 
      या वेळी आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा दिला.या मदतीबाबत सदर मोरे कुटूंबाने आ.सुहास आण्णा कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी किरण आण्णा कांदे, सागर भाऊ हिरे, प्रकाश भाऊ शिंदे, बाजार समितीचे उपसभापती दिपक भाऊ मोरे, प्रमोद भाऊ भाबड, अमोल शेठ नावंदर, आण्णा मुंढे, रमेश काकाळीज आदींची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...