मनमाड ( विशेष प्रतिनिधी ) - मनमाड शहरात भासत असलेली पाणीटंचाई याचा फटका मनमाड रेल्वे स्टेशनवर ही जास्त प्रमाणात बसला आहे . येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वे गाडीतून जात असताना अति उष्णतेमुळे पाण्याची जास्त गरज भासत आहे . रेल्वे गाडी ही स्टेशनवर जास्त वेळ उभी राहत नाही. तसेच प्रत्येक वेळेस पाणी बॉटल विकत घेणे हे सामान्य प्रवाशांना परवडत नाही . ही गोष्ट लक्षात येता पंकज खताळ पाटील फाउंडेशन , लायन्स क्लब मनमाड , आरपीएफ इन्स्पेक्टर देसवाल साहेब , नाना भालेराव (वाणिज्य अधिकारी), संजय कांबले (रेल्वे टिसी डिपो इंचार्ज ) , लायन्स क्लब मनमाड अध्यक्ष सुचेता पंकज खताळ, सेक्रेटरी गणेश हाडपे, संगीता शेजवळ संतोष जैन शाम शूगवानी रेल्वेचे वेगवेगळे विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या संकल्पनेतून पुष्पक एक्सप्रेस व पवन एक्सप्रेस या रेल्वे गाडीतील प्रवाशांना मोफत पाणी वाटप केले गेले व सर्व प्रवाशांना त्या पाण्याचा फायदा झाला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment